नवापूर शहराजवळ गाडी पलटी होऊन 11 जखमी

0

नवापूर । नवापूर शहराजवळील नवरंग रेल्वे गेटच्या काही अतंरावर शनिवारी दुपारी तीन वाजता तवेरा गाडी पलटी झाल्याने 11 प्रवाशी जखमी झाले. सुरत येथुन साक्री तालुक्यातील चिचखेडा येथे लग्नाला जात असताना समोरुन येणार्‍या ट्रकने कट मारला. यामुळे गाडी रस्त्याचा शेजारी असलेल्या शेतात 3 पलटी मारुन 11 प्रवाशी जखमी झाले. त्यापैकी 4 जण गंभीर जखमी झालेल्या मुळे त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

अन्य जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी मध्ये संगिता बेडसे, आरती बेडसे, किशोर सोनार, दादाजी बेडसे, वैशाली जगताप, उजनाबाई बेडसे, सविता पाटील यांचा समावेश आहे. हे सर्व प्रवाशी सुरत (गुजराथ) राज्यातील आहेत. इतर प्रवाशांची नावे समजु शकली नाहीत. घटना घडल्यानंतर तत्काळ 108 क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात हलविले गेले. जखमींना उपचारासाठी दाखल केल्यावर तत्परतेने व््ैदयकीय अधिकारी डॉ. आविनाश मावची व त्यांच्या सहकार्‍यांनी उपचार केले.