नवापूर शहरातील लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप

0

नवापूर। आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या प्रमुख नेतृत्वखाली नवापूर शहरातील सर्व दहा प्रभागात असंख्य गरीब व गरजु लोकांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. आमदार शिरीषकुमार नाईक, सर्व नगरसेवक, नगरसेविका,शहरातील दानशुर व्यक्ती यांच्या आर्थिक मदतीने प्रत्येक प्रभागात १०० प्रमाणे १० प्रभागात गृहोपयोगी साहित्याचे १ हजार किट वाटप करण्यात आले.

कोरोना महाविषाणुच्या संकटात आ. शिरीषकुमार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवकांची बैठक घेऊन नियोजन केले होते. लाँकडाऊन झाल़्यावर हातावर पोटभरणाऱ्या अत्यंत गरजु लोकांची उपासमार होऊ नये म्हणुन सर्व आमदार शिरीषकुमार नाईक यांनी तातडीने नियोजन करुन शहरातील असंख्य गरजुंना मदतीचा हात दिल्यामुळे त़्यांची सोय झाली आहे.नियोजनाप्रमाणे परिसरातील असंख्य गरजु लोकांना गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरीया, गटनेते आशिष मावची, विरोधी पक्ष नेते नरेंद्र नगराळे व सर्व नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होते.प्रत्येक प्रभागात त्या प्रभागातील नगरसेवक व नगरसेविका, नागरिक यांचे सहकार्य लाभले.