नवापूर शहरात डेंग्यूचा रूग्ण आढल्याने खळबळ

0

नवापूर । शहरात डेंग्युचा रुग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील देवळफळी भागातील सागर दिलीप बेडसे (वय 22) रा. देवळफळी पंप हाऊस जवळ या युवकास काही दिवसापुर्वी ताप आला. शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु केला मात्र ताप उतरत नव्हता. अखेर त्यास बारडोली (गुजरात) येथील डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने लॅबमध्ये तपासले असता डेंग्यु झाल्याचे निष्पन्न झले. काही महिन्यांपुर्वी चार जणांना डेंग्यु झाला होता. त्यांनी गुजरात व अन्य जिल्हात जाऊन उपचार करुन घेतले. काही भिती व पेपरात बातमी येवून बदनामी होईल म्हणुन सांगत नाही व गुपचुप गुजरात येथे जाऊन उपचार करुन घेतात. सागरचा भाऊ आकाश बेडसे यांने डेंग्यु झाल्याचा रिपोर्ट व देवळफळी भागात असलेले घाणीचे फोटो जनशक्ती कडे आणुन दिले.

अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
देवळफळी इंदिरानगर, शास्त्रीनगर, गिता सॉमील, नवभारत हौसीग सोसायटी, गढी या भागात मोठया प्रमाणात डासांमुळे परिसरातील नागरीकांना डेग्यु, मलेरिया सारख्या रोगांची लागण झाली असून लहान मुले तापाने फणफणली आहेत. परिसरातील खाजगी दवाखान्यामध्ये पेंशटची गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे शहराचा मुख्य नाल्याची साफ सफाई करण्यात आलेली नाही. अनेक भागात नागरिक कचरा टाकत असल्याने व साफ सफाई होत नसल्याने शहरात मोठया प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रशासनाकडुन नियमित धुर फवारणी केली जात नसल्याने साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नपाने सफाई न केल्यास आंदोलनाचा नागरिाकंनी इशारा दिला आहे.

नवापूर शहरातील देवळफळी भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आमच्या गरीब वस्ती भागात नगर पालिकेचे लक्ष नाही या भागात आजारपण वाढले आहे नगरसेवक या भागात फेर फटका सुध्धा मारत नाही या भागात डास मच्छर एवढ्या प्रमाणात झाल्याने परिसरात डेंग्यु, मलेरीया टायफाईड ने आजार पसरला आहे नगर पालिकेने स्वच्छता करुन औषध फवारणी करावी
– आकाश बेडसे
रहिवाशी, देवळफळी नवापूर