नवापूर शहरात धुंवाधार पाऊस

0

नवापूर। शहरात काल रात्रभर धुवाँदार पाऊस झाला. काल रात्री व आज 4:30इंच पावसाची नोंद झाली असुन आज रविवारी सकाळपासुन मुसळधार पाऊस सुरु झाला. गेल्या आठवड्यापासुन वरुण राजा गायब झाला होता. कडक ऊन पडले होते. हवा गायब झाली होती आणि वातावरणात उकाडा जाणवत होता. नवापूर तालुक्यात एवढा पाऊस होऊन ही उकाडा होवुन नागरीक घामाघुम झाले होते. दरम्यान गणपती बाप्पा आले आणि सोबत पाऊस घेऊन आल्याने शेतकरी राजा पुन्हा सुखावला आहे. श्री गणेश चतुर्थीपासुन शहर व तालुक्यात रोज मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्हात कुठे पाऊस नाही फक्त नवापुर तालुक्यात आहे.

रूग्णांच्या संख्येत वाढ
रंगावली धरण व लघु मध्यम प्रकल्पात पाणी साठा वाढला असुन रंगावली नदी दुधडी भरुन वाहत आहे. दरम्यान वातावरणाचा बदलामुळे सर्दी खोकला,अंगदुखी या आजाराचा रुग्णांची संख्या वाढली आहे. खाजगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात आता पर्यत चांगला पाऊस झाला असुन पीक परिस्थिती उतम असल्याची माहिती युवा शेतकरी दर्शन पाटील, सुळी येथील सत्यवान गावीत यांनी दिली.

सरासरी 1200 मिमी पाऊस
तालुक्यात सुमारे 1200 मिमी सरासरी पाऊस होतो. यापुर्वी याहुन जास्त पाऊस पडायचा. पुर्वी डांग व गुजरात पहाट पट्ट्यातील नवापुरपयर्ंत भाग हा जंगलाने वेढलेला होता. यावेळी मुसळधार पाऊस होऊन रंगावली नदीस अनेक वेळा पुर यायचा. काही दिवस सुर्य दर्शन व्हायचे नाही असे जुनजाणते लोक सांगतात. कालांतराने लोकवस्ती वाढली ,जंगले नष्ट झाली आणि पाऊस ही कमी होऊ लागला आहे असे असले तरी इतर जिल्हाचा मानाने नवापुर पाऊस व पाणी याबाबत खुपच नशीब असल्याचे बोलले जात आहे.

भाविकांच्या उत्सहावर विरजण
पहिल्या दिवशी गणपती दर्शनला रात्री 8 वाजेला नागरीक बाहेर पडले आणि पाऊस सुरु होऊन सर्वत्र धावपळ सुरु झाली. पावसाने भाविकांच्या उत्साहावर विरजण आणले. अगदी शांत पाऊस जोरात पुन्हा सुरु झाला आहे. गणेश मंडळांनी पावसाची शक्यता लक्षात पुर्वीच मंडपात पर्यायी व्यवस्था करुन ठेवली आहे. महसुल विभागातर्फ मंडळ विभागात नवापूर ,नवागाव, चिंचपाडा, विसरवाडी,खोकसा या पाच ठिकाणी पाऊस मोजमाप मशिन ठेवण्यात आले असुन रोज याबाबत नोंदी ठेवण्यात येत आहे.