नवापूर। शिवसेनेने मागील कित्येक वर्षापासून शहरात होणार्या नियमबाह्य बांधकाम करून कोणतीही सुविधा देत नसलेल्या व्यापारी संकुलनामुळे उद्भवणारा वाहतूक प्रश्न, पार्किंग प्रश्न, संडास, मुतार्यांच्या प्रश्न व त्यासह नाना विविध समस्यांमुळे नवापुरकर जनतेला अगनीक त्रास सहन करावा लागतो. त्याविषयी 24 एप्रिल 2017 रोजी नवापुर शिवसेनातर्फे तहसिलदार यांना येणार्या 1 मे 2017 महाराष्ट्र दिनी सार्वजनिक ध्वजवंदनाच्या वेळेपासून नवापूर तहसील कार्यालयासमोर बेमूदत उपोषण करने बाबत निर्वानिचा इशारा दिला होता.
वेळोवेळी निवेदन देवूनही अद्याप कारवाई नाही
सदर बैठकित आगामी 3 महीन्याच्या आत संबंधितावर कायदेशीर कारवाई करू असे तहसीलदार यांच्या समक्ष मूख्याधिकारी यांनी लेखी विनंती केल्यामूळे 1 मे रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र आज तीन महीन्यावर कालावधी जाऊन देखील नगर पालीका प्रशासन मूग गीळून गगप्प बसली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत शहरात बरेच बेकायदेशीर बांधकाम झालेत ते देखील नगरपरीषद प्रशासन थांबवू शकलेली नाही म्हणून येणार्या 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर निवेदनातील मागण्यांवर कारवाई होत नाही तोपर्यत बेमूदत साखळी उपोषन करणार असल्याचे म्हटले आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
निवेदनावर उपजिल्हा प्रमूख हसमूख पाटील, तालूका प्रमूख गणेश वडनेरे, शहरप्रमूख गोविंद मोरे, कामगारसेनेचे राजेश जयस्वात, उपतालूका प्रमूख प्रविण ब्रंम्हे, आनिल वारूडे, दर्पण पाटील, गणेश पाटील, मनोज वाडीले, निलेश सोनार, यूवासेना शहर अधिकारी राहूल टिभे, वाहतूक सेनेचे आनंद वाघ, विभाग प्रमूख दिनेश खैरनार, विभाग प्रमूख संतोष पाटील, यूवासेना राहूल पंचोली, भटू पाटील, संकेत पाटील, शिवसेना महिला आघाडीचा उपजिल्हा संघटक ज्योती चौधरी, शहर संघटक उज्वला वडनेरे, शहर संघटक लिला मराठे, सरला पाटील मिनाक्षी ब्रम्हे यशोदा अग्रवाल मनिषा सोनार सिमा ब्रंम्हे यांच्या स्वाक्षर्या आहेत.