नवापूर शहरात भरदिवसा पथदिवे सुरू; पालिकेचे दुर्लक्ष

0

नवापूर । शहरातील पथदिवे रात्रीपेक्षा भरदिवसा जास्तच लख्ख प्रकाश देऊ लागल्याने दिन दहाडे बिजली लोक म्हणू लागले आहे. गेल्या काही दिवसापासुन सराफ गल्ली, सरदार चौक, राम मंदिर गल्ली आदी भागतात पथदिवे सुरू असतात. नगरपालिकेला रहिवाश्याकडून वारंवार कळवूनही पुन्हा काही दिवसाने ते दिवसा सुरू झाल्याचे प्रकार सुरू होतात. रात्रभर सुरू असलेले पथदिवे बंद करण्याचे विसरतात की निष्काळजी पणा सुरू आहेत, याबाबत सवाल केला जात आहे. राञभर रस्त्यावर प्रकाश देता त्याबरोबर संपूर्ण दिवस ही सुर्याचा लख उजेडातही नगरपालिका व वीजकंपनी वीज देऊ लागली आहे, की ही नवीन योजना आहे, असा सवाल केला जात आहे.

त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी
भरदिवसा पथदिवे सुरू झाल्याने नगर पालिकेला भरमसाठ वर बील येऊन नुकसान सोसावे लागणार आहे. हा खर्च शेवटी कर रूपाने रहिवाशांन कडुन वसुल केला जाणार आहे. एवढी वीजेची उधळपट्टी चालली आहे. एखाद वेळी चुकून पथदिवे सुरू राहुन जातात हे आपण समजु शकतो पण वारंवार भरदिवसा पथदिवे सुरू असल्याचे प्रकार पाहून रहिवासी सुध्दा आता आवाक झाले आहेत. वीजेचे दर कमी झाले आहेत की वेळेपुर्वी दिवाळी साजरी केली जात आहे, असा टोमणा मारला जात आहे. भरदिवसा पथदिवे सुरू झाल्याचा प्रकार पाहून नगरपालिका निवडणुकीची दिवाळी साजरी होत असल्याचे बोलले जात आहे. भरदिवसा सुरू होत असलेले पथदिवे याकडे गंभीरपणे लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.