नवापूर शहरात मोकाट गुरांचा प्रश्‍न बनला गंभीर

0

मोकाट जनावारांच्या मालकांच्या दुर्लक्षाने त्यांचा आजाराने मृत्यू

मोकाट जनावरे गल्लोगल्ली रस्त्यावर ; ओट्यावर घाण करीत असल्याने दुर्गंधी

नवापूर । शहरात मोकाट गुरांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत चालली असुन मोकाट गुरांसाठी कोंडवाडा करण्यास नगर पालिका असमर्थ ठरली आहे. मेन रोड,बाजार पेठ,बस स्थानक रोड व वर्दळीचा रस्त्यांवर मोकाट गुरे बसुन राहत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे. गल्लो गल्ली गुरांचे कळप तयार झाले असुन गुरांचा मारामारीने अनेक जण जखमी देखील झाले आहेत. या मोकाट गुरांचा मालकांनर कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

उकीरड्यावरील प्लास्टीक पिशवी जनावरांना ठरत आहे घातक
गुरे मालक गुरांकडे लक्ष देत नसल्याने गुरांना आजाराचे लागण होऊन ते मुत्युमुखी पडत आहे. तर काही ठिकाणी आजारी गुरांची सेवा गौरक्षक करतांना दिसतात अनेक ठिकाणी वाहनाचा धडकेत अनेक गुरे जखमी देखील झाले आहेत. मोकाट गुरे गल्लोगल्ली ऱस्त्यांवर नागरीकांचा ओट्यावर घाण करतात. यामुळे परिसरात दुर्गधी ही पसरते. मोकाट गुरांना रोज खायाला मिळत नसल्याने ते भाजीपाला मार्कट,दुकानात,घरात घुसुन मिळेल ते खाऊन टाकतात. अनेक वेळा उकीरड्यावर प्लास्टीक पिशवी,विषारी वस्तु खाऊन मेल्याचा घटना घडलेल्या आहेत. तसेत मोकाट गुरांना पकडुन ती कत्तल खान्याकडे घेऊन जाण्याचे प्रकार सुरु असल्याचे बोलले जात असुन या गंभीर हालचालीकडे लक्ष देणे गरजेचे असुन पशुधनाचे हे हाल थांबवणे गरजेचे आहे.

कोंडवाडा नसल्याने समस्या
मोकाट गुरांचे कळप रस्त्यांवर ठाण मांडुन बसले की किती ही प्रयत्न केला की तेथुन हटत नाही. यामुळे वाहतुक ठप्प होऊन ट्राँफीक जाम होत असते. शांतता कमेटीत प्रत्येक वर्षी मोकाट गुरांचा प्रश्‍न गाजतो. कोंडवाडा करण्याचे पालिका आश्‍वासन देऊन वेळ मारुन नेते. मात्र कोंडवाडा अद्यापही तयार झालेला नाही. वाहतुक व मोकाट गुरे हे प्रश्‍न शहरासाठी गंभीर व डोकेदुखी ठरले आहेत. यावर कोणांचेच नियत्रंण राहीलेले नाही. मोकाट गुरांची समस्या सुटण्यासाठी पालिकेने गुरांचा कोंडवाड्याची सोय केली पाहीजे. तसेच मोकाट गुरांचा मालकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.