संवेदन बहुउद्देशिय फाऊंडेशनची मागणी ; मोकाट जनावरांमुळे दुर्गंधी
नवापुर । शहरात फिरणार्या मोकाट जनावरांची सोय होणे बाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांना संवेदन बहुउद्देशिय फाऊंडेशन तर्फे देण्यात आले. नवापुर शहरात मोकट फिरणारी जनावरे (गाई,म्हशी,बकर्या) ही मोठया प्रमाणात दिवसा आणि रात्री केव्हाही त्यांच्या झुंडी ह्या मुख्य रस्त्यांवरुन तसेच नवापुर शहरातील विविध परिसरात फिरत असतात. यामुळे या रस्त्यावरुन चालणारी वाहने व पादचार्यांना यांचा अडथळा निर्माण होवुन अपघात संभवतात.
साथीचे आजार पसरण्याची व्यक्त केली शक्यता
याचप्रमाणे रात्रीत्या वेळी ही जनावरे झुंडीकरून रस्त्यांवर कोठेही ठाण मांडुन बसतात. तेथेच शेण टाकतात. यामुळे परिसरात दुर्गधी पसरते शिवाय सध्या पावसाचे दिवस सुरु असुन या दुर्गधीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही म्हणुन नवापुर शहरात फिरणार्या या मोकाट जनावरांची कुठेतरी एकाठिकाणी सोय करण्यात यावी.असे निवेदना मध्ये म्हटले आहे.निवेदनावर संवेदन बहुउद्देशिय फाऊंडेशन या अध्यक्षा प्रा.डॉ.मंदा मोरे,अॅड. भावना शर्मा,डॉ.अर्चना नगराळे, आशा खैरनार, मेघा बिरारिस,निलीमा शेटे,प्रा.कमल शहा,रुपाली काथावाला,कविता खैरनार,आदीचा सह्या आहेत.