नविन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज

0

मुक्ताईनगर । स्पर्धात्मक युगात दररोज नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. अशा जीवनोपयोगी तंत्रज्ञानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करुन प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रगतीच्या प्रवाहात समावेश करुन प्रत्येक विद्यार्थ्याला प्रगतीच्या प्रवाहात समावेश करुन जो पुणे- मुंबईसारख्या ठिकाणी प्रगत व परिपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जातो त्याच दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागात शिकविले जावू शकते. यातूनच डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार होऊ शकते असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. जिल्हा परिषद शाळेतील डिजीटल वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

चित्रफितीच्या माध्यमातून ज्ञानाचे नवे दालन खुल
प्रोजेक्टरच्या माध्यमातून परिपूर्ण व कसदार शिक्षणाचे द्वार खुली झाली असून एक चित्र हजार शब्दांचे काम करते. चित्रफितीच्या माध्यमातून ज्ञानाचे नवे दालन खुले झाले असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवे असे विचार तहसिलदार रचना पवार यांनी व्यक्त केले. प्रसंगी सभापती शुभांगी भोलाणे, उपसभापती प्रल्हाद जंगले, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, पंचायत समिती सदस्या सुवर्णा साळुंके, विकास पाटील, गटविकास अधिकारी विजय सरोदे, केंद्रप्रमुख अनिल पाठक, सरपंच मंगला पिवटे, राजेंद्र वानखेडे, गुणवंत पिवटे, राजू कुलकर्णी, मुख्याध्यापक यशवंत तायडे, वंदना तायडे उपस्थित हातेया. प्रास्तविक कैलास मोरे यांनी तर सुत्रसंचालन राजीव वंजारी यांनी केले. आभार संजय निंभोरे यांनी मानले.