नंदुरबार । सर्व करदात्यांना आवाहन करण्यात येते की, 1 जुलैपासून संपूर्ण देशात वस्तू व सेवा कर कायदा लागू झाला आहे. या करप्रणालीबाबत दडपण घेऊ नये. कर प्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रियांमध्ये अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर सोडविल्या जातील. कापड उद्योगातील व्यापार्यांप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र आहेत. त्यांना 30 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येईल, अशी माहिती विक्रीकर उपआयुक्त, सिमा तपासणी नाका यांनी दिली आहे.