नवीन घनकचरा प्रकल्प लवकरच सुरू होणार

0

जळगाव। जळगाव महापालिकेने बिओटी तत्वावर हंजीर बायोटीक या कंपनीला चालविण्यास दिलेला घनकचरा प्रकल्प गेल्या चार वर्षापासून बंद आहे. हा प्रकल्प पालिकेने ताब्यात घेतला आहे. याठिकाणीच नविन घनकचरा प्रकीया प्रकल्प उभारण्याची तयारी नवसारी येथिल ‘झिरो वेस्ट’ या कंपनीने दाखविली आहे. याचा पाठपुरवा करण्याबाबत प्रभारी आयुक्तांना पत्र दिल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली.

चार वर्षांपासून बंद होते प्रकल्प
महापालिकेने आव्हाणे शिवारातील सहा हेक्टर 53 आर जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळवून घनकचरा प्रकल्पासाठी हंजीर बायोटेक या कंपनीला दिली होती. प्रकल्पस्थळी जळगाव शहरातील कचजयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरूही झाले. मात्र, जुलै 2013 मध्ये प्रकल्पाच्या ठेकेदाराने आपले काम अचानक बंद केले. तेव्हापासून हा प्रकल्प बंद आहे. गेल्या चार वर्षांपासून कचजयाची डंपीगचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तीन महिन्यात प्रकल्प सुरू होईल, कंपनीचा दावा
चार वर्षांपासून या प्रकल्पावरील घनकचरा प्रकीयेचे काम जुलै 2013 मध्ये थांबले आहे. तरही आरोग्य विभागाकडून दररोज शहरात जमा होणारा सरासरी सुमारे 110 टन कचरा याठिकाणी टाकला जातो. गेल्या चार वर्षांपासून येथे सुमारे 1 लाख टनापेक्षा जास्त कचरा प्रक्रीयेविना पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. नुकता हा प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील स्वच्छ शहराच्या यादीत देखील जळगावच्या मानांकनात घट झाली होती. हा प्रकल्प सुरु झाल्यास मानांकनात वाढ होण्याची देखील शक्यता महापौर नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केली. याठिकाणीच नविन घपकचरा प्रकीया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने नुकताच 16 कोटी 85 लाख रुपयांचा डिपीआर तयार केला आहे. तसेच नुकतीच ‘झिरो वेस्ट’ कंपनीने हा प्रकल्प सुरु करण्याची तयारी दर्शविली असली तरी निवीदा काढूनच हा ठेका दिला जाणार आहे. कंपनीने तीन महिन्यात हा प्रकल्प सुरु करण्यात येईल असा दावा केला आहे. 4 ते 5 कोटी रुपयांची नवीन यंत्रया ठिकाणी घेण्यात येणार आहे.