नवीन दारू दुकानांना परवानगी न देण्याचा ठराव

0

शिक्रापूर । शिक्रापूरात नवीन दारू दुकानांना व बारला परवानगी न देण्याचा ठराव सरपंच जयश्री दत्तात्रय भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. यामुळे भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिरूर तालुका दारू बंदी अभियानाचे प्रणेते संजय पाचंगे, रामभाऊ सासवडे, अंकुश घारे, गुलाब पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. या ग्रामसभेत नवीन दारू दुकान चालू करण्यासाठी तीन अर्ज आले होते. परंतु सरपंचांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे हे तिन्ही अर्ज नामंजूर करण्यात आले. सरपंच पदावर असेपर्यंत कोणत्याही दारु दुकानांना परवानगी दिली जाणार नाही, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.