नवीन पिढी घडविण्यासाठी बालकांवर चांगले संस्कार घडवा

0

अमळनेर । येथील स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित मेळाव्यात जाती पातीचे समूळ उच्चटन करून देशासाठी नवीन पिढी घडविण्यासाठी बालकांवर चांगले संस्कार घडवा, असे मार्गदर्शन पर मत गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी अमळनेर येथील कारर्यक्रमात त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी स्वामी समर्थ केंद्रामार्फत सुरु असलेल्या 16 विभागांची माहिती उपस्थितांना दिली. यात त्यांनी सानेगुजींनी जी शिकवण या जगाला दिली. त्याची सुरुवात अमळनेरातून झाली आणि यापुढे हे कार्य अमळनेर पॅटर्न या नावाने संबोधले गेले पॅटर्न या शब्दाचे उगमस्थान हे साने गुरुजी आहे, असे ते म्हणाले, मुलांवर संस्कार चांगले करा असा संदेश देत परीक्षा मुलांची आणि धास्तावतात पालक यामुळे पालक मुलांवर अभ्यासाची सक्ती करतात आणि मुलाला त्याचीच आठवण पडते या मनोवृत्तीला पालकांपासून दूर करण्यासाठी आमचे सेवेकरी पालकांशीही हितगुज करतात. असेही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

16 विभागांच्या माध्यमातून सुरु असलेल्या सेवेबद्दल माहिती देत प्रश्नोत्तराच्या पहिल्या विभागात अनेक लोक समस्या घेऊन येतात पण या जगात समस्या प्रत्येकाला असून उत्तरही त्यातच दडलेलं आहे तर या पूर्वी सर्वात जास्त लग्नात हुंडा घेणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख होती आणि तेच समस्येचे खरे कारण होते पण आज तोच जिल्हा हुंडा न घेण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या सर्व समस्या घेऊन येणार्‍या अनेक भक्तांना आमच्या सेवेकर्यांनी समजावले या विषयापासून दूर घेऊन जात खोट्या प्रतिष्टेच्या आहारी न जाता कमी खर्चात लग्न घडवून आणले आता ती सर्व जोडपी वाद न करता सुखी आहे. आपण सर्व माती पासून जन्माला आलो म्हणून मातीचे सदैव ऋणी रहा, असे म्हणत दुसरा विभाग हा वैद्यकीय विभाग असून डॉक्टरांनी लोकांच्या सेवेसाठी काही काळ द्यायला हवा. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहील, आमच्याकडे सेवेत असलेल्या डॉक्टर मंडळींनी भक्तांना नैसर्गिक वनस्पती ज्याची अनेकांना माहिती नाही. या माध्यमातून अनेक कर्करोग, मधुमेह, किडनीचे आजार बरे केले आहे याचा लाभ सर्वानी घ्यायला हवा असे आवाहन करत या समाज कार्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे यामुळेच देश पार्ट एकदा बलशाली बनेल. कारण कोणत्याच देशाच्या नावात माता हा शब्द नसून आपल्याच देशाचे नाव भारतमाता म्हणून संबोधले गर्वाची बाब आहे. याचे सर्व श्रेय आपल्या माता भगिनींना जाते प्रत्येक केंद्रात भारतीय संस्कृती मराठी अस्मिता विभाग आहे.असे म्हणत मुलींनी मुलांचे कपडे परिधान करू नये या मुले त्यांना वैवाहिक जीवनात अपत्य होण्यास त्रास होतो असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलनानंतर अकोल्याचे सुनील धाबेकर, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, कलावती सुरेश ललवाणी या चारही व्यक्तींनी अमळनेर केंद्राला दिलेल्या बगीच्यासाठी पालिकेकडून जागा व त्यावरील सुशोभीकरणा विषयी कौतुक करत सन्मान केले. तर गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांचा सत्कार अमळनेर केंद्राचे अध्यक्ष नगरसेवक प्रवीण पाटील यांनी केला. कार्यक्रमास खासदार ए.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांच्यासह महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धुळे येथील सय्यद वाहिद अली यांनी केले.