यावल। नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना पुन्हा सुरू करावी तसेच सातव्या वेतन आयोगाने सुचविलेल्या योजनांच्या अमंलबजावणीसाठी येथील तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवार 25 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार सुनील समदाने यांना देण्यात आल़े.
यांची होती उपस्थिती
पेंशन योजनेच्या मागण्यासाठी तालुक्यातील बहुतेक राज्य कर्मचारी संघटनेने शिक्षक संघटनेस पाठींबा दिला आहे. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक शे. असलम शे. नबी, सुधाकर धनगर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत मोटे व पदाधिकारीसह तालुक्यातील शिक्षक वृंद उपस्थित होते.
यांचा मिळाला पाठिंबा
आंदोलनास आदिवासी विभाग कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, कास्ट्राईब संघटना, शिक्षक सेवा संघ यासह अनेक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.