नवीन मालमत्ता कर कमी करण्याची मागणी

0

एरंडोल । एरंडोल नगरपालिकेने नुकतीच नवीन कर आकारणी घोषित केली आहे.त्या विरोधात आज एरंडोल शिवसेने तर्फे एरंडोल नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना निवेदनावर विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, विभागप्रमुख प्रमोद महाजन युवा सेना शहरप्रमुख अतुल महाजन तालुका संघटक सुनील मानुधने शहरप्रमुख प्रसाद दंडवते, नगरसेविका तथा गटनेत्या दर्शना ठाकूर प्रमोद महाजन,भिका महाजन,अतुल पाटील,गोपाल महाजन, गटनेता तथा आदीच्या सह्या आहेत.

आंदोलनाचा दिला इशारा
एरंडोल शहरातील नागरिकांना नवीन मालमत्ता वाढीव कराची नोटीस एरंडोल नगरपालिकेने दिलेली असून सदर वाढीव कर वीस टक्के इतका असून शहरातील रहिवाशी औद्योगिक,व्यापार विषयक,व्यवसायीकांना व नागरिकांना जाचक आहे. एरंडोल शहरात मध्यम वर्गीय, अतिमध्यम वर्गीय, शेतकरी, शेतमजूर, आदिवाशी, मागासवर्गीय, तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी, नोकर वर्ग राहतो.तसेच नवीन वसाहतीमध्ये अद्याप रस्ते, गटार, दिवाबत्ती या मुलभूत सुविधा नाहीत. यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे व शासनाची विविध क्षेत्रातील महागाई या सार्‍या गोष्टीमुळे मालमत्ता फेर वाढीचा फेर विचार करावा, तो मालमत्ता रद्द करावा, या वाढीव कराला आमच्या पक्षाचा व शहरातील जनतेचा तीव्र विरोध असून सदर मालमत्ता कर रद्द करून पुरवठा आकारणी करावी, अन्यथा आम्ही जनाक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.