पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या हद्दीतील नवीन मिळकतींची 2017-18 रा आर्थिक वर्षात जीआरएस (जिओग्राफीक इफॉर्मेशन सिस्टीम) द्वारे नवीन मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे मिळकतीमध्ये व उत्पन्नात 25 टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे. राविषरी बोलताना सहआरुक्त दिलीप गावडे म्हणाले की, नवीन आर्थिकवर्षात जीआरएस प्रणालीद्वारे मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये गुगल मॅपवर या मिळकती येणार आहेत. त्यामुळे नवीन मिळकतींची नोंदही वाढेल, शिवार मिळकतीचे स्वरुप, त्यांचा कर आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नातही 25 टक्के वाढ अपेक्षित आहे.
कर आकारणे सोपे जाणार
त्या सर्वेक्षणात नवीन शोधणे, वाढीव बांधकामांची नोंद, वापरात बदल झालेत्या मिळकतीही या सर्वेक्षणातून कळणार आहेत. त्यानुसार त्या मिळकतीवर निरंत्रण ठेवणे व कर आकारणे सोपे जाणार आहे. तसेच यावेळी गावडे म्हणाले की, नवीन आर्थिक वर्षात आम्ही मिळकतींचा आढावा ही दर तीन महिन्राने व वार्षिक आढावा अशा दोन स्वरुपात आढावा घेण्याचे आमचे नियोजन आहे. मिळकतधारकांना नोटीसा पाठवणे, वसूली करणे, असे निरोजन केले जाणार आहे.