नवीन वर्षात हे स्टारकिड्स करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

0

मुंबई : २०१८मध्ये अनेक स्टारकिड्स बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. आता २०१९मध्ये आणखी काही स्टारकिड्स बॉलीवूडमध्ये एन्ट्री करायला तयार आहेत. २०१८मध्ये श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने पदार्पण केले.

आता पुढील वर्षी श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर, मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे, आणि तारा सुतारीया हे स्टारकिड्स बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत.