जळगाव। साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्यतृतीया म्हणजेच आखाजी सणाच्या निम्मिताने शहरातील बाजारपेठ मध्ये वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सुवर्ण बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. वाहनांच्या शोरूममधून आजच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहने विक्री होण्याचा अंदाज आहे. तर बांधकाम व्यवसायात देखील लाखोंची उलाढाल होणार असल्याचे एका व्यावसायिकाने कळविले आहे. बाजारपेठ भागात आखाजीच्या दोन दिवसा आगोदरच नागरिकांची खरेदीची लगबग सुरु आहे. यादिवसात नवीन वस्तू खरेदी केल्यास शुभ मानले जाण्याचा समज आहे. खान्देशात आखाजी सणाची आतुरतेने वाट बघतली जाते.
स्पोर्ट गाड्याची तरुणांना क्रेज
अक्षय्यतृतीया च्या दिवशी वाहन खरेदीची परंपरा सामान्य कुटुंबांत आजही कायम असून त्यात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेस वाहन खरेदीसाठी जळगावकर नक्कीच शोरूम मध्ये गर्दी करतील यासाठी व्यावसायिक देखील सज्ज झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आखाजीच्या दिवशीच वाहने खरेदी करण्याची परंपरा असलेल्या ग्राहकांनी आगोदरच आपल्या पसंतीचे वाहन बुकींग करून ठेवले आहे. यंदा ऑनलाईन बुकींग देखील विक्रेत्याच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हीरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस, पॅशन प्रो, स्प्लेंडर स्मार्ट या मॉडेल्ससह सीबीजी एक्स, हंक, अचिव्हर, हीरो इम्पल्स, करिझ्मा, प्लेझर, मॅस्ट्रो या गाड्यांना ग्राहकांची अधिक पसंती आहे. यामध्ये आता स्पोर्ट मोटारसायकल दुचाकीची भर पडली आहे. महिंद्र ऍण्ड महिंद्र‘च्या विविध प्रकारच्या गाडयांना ग्राहक पसंती देत असल्याचे सांगण्यात आले आहे.
बुलेट, चारचाकींचीही विक्री : सध्याच्या काळात बुलेटची क्रेझ प्रचंड वाढली आहे. रॉयल इनफिल्ड घेण्यासाठी प्रतीक्षेत थांबावे लागत असल्याची तक्रार अनेक ग्राहकांची आहे. बुलेटचे विक्रेते उषा मोटर्स या शोरूममध्ये अगोदर गाड्या बुकींग करून ठेवण्यात आलेल्या आहे. तरुणाचा वाहन खरेदी करताना सैराट चित्रपटाची प्रसिद्ध आजही कायम आहे. आजच्या आधुनिक युगात रस्त्यावर बुलेट अधिक धावणार असल्याचे समजते. प्रत्येकाचे स्वप्न असलेल्या चारचाकी वाहने खरेदी ग्राहकाकडून करण्यात आल्याचे दिसून आले.
ज्वेलरीत सोने खरेदी; काहीचे गृहप्रवेश होणार
सोने खरेदी करण्याचा मुहूर्त अक्षयतृतीयेचा साधला जातो. जळगावशहराची ओळख सुवर्ण नगरी म्हणून संपूर्ण जगात आहे. यामुळे इतर जिल्ह्यातून व राज्यातून लोक सोने खरेदी करण्यासाठी जळगाव येथील सोने खरेदी करण्यास पसंती दिली जाते. सोने खरेदी करणे महत्वाचा योग मानला जातो. दिवसभरात सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार सांगण्यात आले. आजच्या अक्षय्यतृतीया च्या शुभ मुहूर्तावर अनेकांनी गृह प्रवेश करण्याची तयारी केली आहे. जळगावात गृहप्रवेश करणार्यांची संख्या शंभरावर असल्याची माहिती काही बांधकाम व्यावसायिकांकडून देण्यात आली. याशिवाय, दुपारी अनेकांनी जिल्ह्यातील विविध बांधकाम साइटवर जाऊन पाहणी केली. असून घराची बुकिंग केल्याचेही सांगण्यात आले.