नवीन शैक्षणिक धोरण ‘क्रिएटिव्ह, क्युरियॉसिटी’ला गती देणारे: मोदी

0

नवी दिल्ली: तब्बल ३४ वर्षानंतर केंद्र सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करून नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. प्रदीर्घ विचारमंथनानंतर हे शैक्षणिक धोरण अमलात आणले आहे. नवीन शैक्षणिक धोरण संशोधन आणि विश्लेषणावर आधारित असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचे देशातील शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी स्वागत केले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नवीन शैक्षणिक धोरणावर आपले विचार प्रकट केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण विचारला गती देणारे आहे. काय विचार करावे? यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून कसे विचार करावे? यावर नवीन शैक्षणिक धोरणावर जोर देण्यात आला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. आज शुक्रवारी ७ रोजी झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल-निशंक, राज्य मंत्री संजय धोत्रे, राष्ट्रीय शिक्षण धोरणात महत्त्वाची भूमिका निभावणारे शास्त्रज्ञ कस्तुरी रंगन आदींसह देशभरातील शिक्षणतज्ञ उपस्थित होते.

भविष्याचा विचार करुनच नवीन शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवे शिक्षण धोरण उपयुक्त आहे. “आज देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक आपलं मत मांडत आहे. शिक्षण धोरणावर मंथन करत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे,” असे मोदींनी यावेळी सांगितले.

क्रिटीकल आणि इनोव्हेटिव्ह धोरणाला गती देणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याला मूर्तरूप देणारे नवीन शैक्षणिक धोरण आहे. आपले आजपर्यंतचे शैक्षणिक धोरण तरुणांना क्रिएटिव्ह, क्युरियॉसिटी आणि कमीटमेंटसाठी प्रोत्साहित करीत होती का? याचे उत्तर तुम्हाला माहित असेल असे मोदींनी उपस्थितांना सांगितले.