नवीन हातोडा पुलावर खड्डेच खड्डे

0

१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले होते लोकार्पण

२००८ साली पुलाच्या कामास करण्यात आली सुरुवात

तळोदा । मोठ्या थाटात दि १५ आगस्ट रोजी हातोडा पुलाचे लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, खा. हिना गावीत आ. उदेसिंग पाडवी,आ. विजयकुमार गावीत, आ. चंदूभैय्या रघुवंशी यांच्या साक्षीने पार पडला. त्यादिवसापासून तळोदावाशीयांनी फार वर्षा पूर्वी स्वप्नात पाहिलेला पूल वाहतुकीसाठी खुला करून १५ आगस्ट स्वतंत्र दिनाची भेट दिली. मात्र, या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या पुलाचे बांधकाम ते उद्घाटनापर्यंत सतत चर्चेंत होता. त्याच्या लोकर्पणानंतरही खड्ड्यांमुळे हातोडा पुल चर्चेत आहे.

अवजड वाहनांना परवानगी नाही
जिल्ह्याचे अंतर निम्म्याहून कमी करणार्‍या हातोडा पुलाचे काम सन २००८ मध्ये सुरू करण्यात आले होते. कामाच्या अतिशय संथगतीमुळे तब्बल नऊ वर्ष लागले. आता नुकतेच काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र उद्घाटनाशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला करू नये, अशी भूमिका संबंधित विभागाने घेतली होती. त्यामुळे पूल तयार होऊनही जनतेबरोबरच विद्यार्थ्यांना प्रकाशामार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत होता. हातोडा पूल वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी यापुलावरून लहान चारचाकी व दुचाकी वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. मोठ्या अवजड वाहनांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. कारण पुलाला जोडणार्‍या वळण रस्त्याअभावी मोठी वाहने शहरातूनच जाण्याची शक्यता केली होती.

खड्ड्यांमुळे वाहनचालकांची तारेवरची कसरत
हातोडा पुलामुळे गावातील वाहतुकीच्या प्रश्न आजून ऐरणीवर आहे. बायपास रस्ता तयार करण्यात न आल्याने वाहनधारकांना खड्यांच्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. हा बायपास रस्ता बांधकामाचे बांधकाम विभाग किंवा नगरपालिकेने हाती घेवून मार्गी लावला पाहिजे. बायपास रस्ता तयार झाल्यास शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. उपजिल्हा रुग्णालयापासून तर हातोडा गावापर्यंत रस्त्यांला मोठ मोठे खड्डे असून लहान वाहनधारकांना या रस्त्यांवरून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. हा रस्ता नवीन असल्यामुळे वाहन चालवतांना अंदाज येत नसून वाहनचालकांना कुठे खड्डा येईल याचा अंदाज येणे अवघड बनले आहे. या खड्ड्यांमुळे वाहन स्लिप होवून अपघात होण्याची दाट श्यक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या खड्ड्यांमुळे रात्रीचा प्रवास धोक्याचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाहनचालकांना चोरांकडून मारहाण
यातच भर आजून आजू-बाजूचा काटेरी झुडपांची रस्त्यांवरील खड्डे त्यासोबत मोठ मोठी रस्त्यांवर लोंबकणारी काटेरी झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. हातोडा पूल हा काहींना काही कारणाने आज पावेतो निधी असो या उद्घाटन अशा बर्‍याच चर्चेचा विषय बनला आहे. गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या हद्दीतून जाणार पूल आहे. याला धडगाव , तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांना जवळ असणार असून शासकीय कामाला किंवा खाजगी कामानिमित्त गेलेल्या माणसाच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. दक्षिणेकडे म्हणजे सजजीपुर जवळ गेल्या चार पाच दिवसात दोन दुचाकी स्वारांना भूरट्या चोरांचा प्रसाद मिळाला आहे.तरी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.