जे़ एम .वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स व उद्धव डिजीटल फोडण्याचा प्रयत्न ; सीसीटीव्ही प्रकार कैद
जळगाव- शहरातील नवीपेठमधील जे़ एम ़वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स व उद्धव डिजीटल या दुकानांमध्ये शुक्रवारी पहाटे दोन चोरट्यांच्याकडून चोरीचा प्रयत्न करण्यात झाल्याची घटना उघडकीस आली आहे़ दरम्यान, कुलूप तोडण्याचा आवाज आल्यानंतर गस्त घालत असलेल्या गुरखा धन बहादूर यांनी सतर्कता दाखवित आरडाओरड केल्याने मुळे चोरट्यांनी घटनास्थळावर सोबत आणलेली टॅमी सोडून पळ काढला. गुराख्याने दाखविलेल्या हिंमतीमुळे मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला़ अन्यथा दोन्ही दुकानांमधील 20 ते 25 लाखांचा मुद्देमाल चोरी झाला असता, अशी यावेळी चर्चा होती. गुरख्याचे धाडसाचे कौतुक होत आहे.
मालवाहू गाडी घेवून आले होते चोरेटे
पोलन पेठ येथील रहिवासी माजी नगरसेवक जितेंद्र रामकिशन मुंदडा यांचे नवीपेठेत जे़ एम़ वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे़ तर शेजारीचं त्यांचे शालक आनंद मंडोरा यांचे उद्धव डिजीटल नावाचे दुकान आहे़ जितेंद्र मुंदडा हे व त्यांचा मुलगा निखिल हे दुकान सांभाळतात़ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकान सुरु असते. गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून निखिल आणि सर्व कर्मचारी निघून गेले़ शुक्रवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास शुक्रवारी पहाटे 3़ 30 वाजेच्या सुमारास मालवाहतूक व दुचाकीवरून आलेले दोन चोरट्यांनी आधी माजीनगरसेवक जितेंद्र मुंदडा यांच्या जे़ एम़ वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला़ दोन्ही कुलूप तोडल्यानंतर शेजारीचं असलेले उद्धव डिजीटल या दुकानाचे कुलूप तोडण्यास सुरूवात केली़
गुरख्याने चोर…चोर असा केली आरडाओरड
उद्धव डिजीटल या दुकानाचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक कुलूप तोडण्याचा आवाज झाला़ नेहमीप्रमाणे गुरखा धन बहादूर हा त्या परिसरात गस्त घालत होता़ त्याला कुलूप तोडण्याचा आवाज येताच त्याने त्याठिकाणी धाव घेतली व अन् समोर चोरटे दिसले़ चोऱ़़ चोऱ़ आरडा-ओरडा करीत त्याने चोरट्यांकडे धाव घेतली़ गुरख्याला पाहून चोरट्यांनी जागेवर दोन टॉमी सोडून धूम ठोकली़ गुरख्याने आरडा-ओरड करताचं परिसरातील नागरिकांनाही जाग आली़ त्यातच गुरख्याने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले़
दुकानांमध्ये होता 20 ते 25 लाखांचा माल
मध्यरात्री 4़ 15 वाजेच्या सुमारास परिसरातील रहिवाश्यांनी जितेंद्र मुंदडा यांना फोन करून घटनेची माहिती दिली़ व त्यांनी दुकानाच्या दिशेने धाव घेतली़ यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडलेले आढळून आले़ तसेच एक कूलूप चोरट्यांनी सोबत नेल्याचेही आढळून आले़ दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक जितेंद्र मुंदडा यांनी त्वरित शहर पोलीस ठाण्यात माहिती कळविली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ व सीसीटीव्ही फुटेज तपासले़ यात मालवाहू रिक्षाहस चोरीच्या प्रयत्न केल्याचा प्रकार कैद झाला होता. दरम्यान, गुराख्याने दाखविलेल्या हिंमतीमुळे मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला़ सुमारे दुकानांमध्ये वीस ते पंचवीस लाखांचा माल होता़