नवीपेठेत हनुमान जयंतीनिमित्त भंडारा उत्साहात

0

जळगाव । शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर संस्थान तसेच महादेव मंदिरातर्फे हनुमान जयंतीनिमित्त रविवारी 16 रोजी नवीपेठ परिसरात महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले. शहरातील पाच हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गेल्या वर्षांपासून इच्छापूर्ती गणेश, महादेव मंदिरातर्फे भंडार्‍याचे आयोजन केले जाते. हनुमान जयंतीनंतर येणार्‍या पहिल्या रविवारी हा भंडारा असतो तसेच गणेश जयंतीला देखील 11 वर्षांपासून भंडारा आयोजित करण्यात येत आहे.

हजारो भाविकांनी घेतला लाभ
रविवारी दुपारपासून भंडार्‍यास सुरुवात झाली. आदल्या दिवसापासून भंडार्‍याची तयारी सुरू होती. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. माजी नगरसेवक संस्थानचे अध्यक्ष श्याम कोगटा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. नगरसेवक मनोज चौधरी, कैलास चौधरी, गणेश गायकवाड, पवन ठाकूर, नीलेश पाटील, सम्राट बेलदार, जितू वाघ, भरत कर्डिले, श्रीनिवास व्यास, योगेश कलंत्री, दत्तात्रय कासार, सतीश माळी, राजू मोरे, विनोद बियाणी, शशी बियाणी, गोटू जोशी, सुनील बारपांडे, प्रमोद जोशी, रवींद्र नांदे, कैलास जोशी, भूषण पाठक यांचे सहकार्य मिळाले.

महाप्रसादाने समारोप
महाप्रसादानंतर काही तासांत परिसराची स्वच्छता करण्यात आली. भंडार्‍यात 150 सेवेकर्‍यांनी सेवा बजावली. सायंकाळी 5 वाजेनंतर महाप्रसादाचे समारोप करण्यात आले. या महाप्रसाद कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अबाल, वृध्द, महिला वर्ग, तरुणांची मोठी उपस्थिती होती.