जळगाव। नवीपेठेतील प्रभात सोडा दुकानाजवळ उभ्या असलेल्या दोन वेगवेगळ्या कारमूधन अज्ञात चोरट्यांनी दार उघडून त्यातील बॅगा चोरून नेल्याची धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास घडला. एका बॅगेत 10 हजारांची रोकड तर दुसर्या बॅगेत 5 हजारांची रोकडसह 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेले आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्2द गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहेत.
दरवाजे लॉक नसल्याचे साधली संधी
उज्वलकुमार नामदेव बोरसे (वय-32) भुसावळातील शांतीनगर भागातील पुखराज पार्क येथील रहिवासी आहेत. तर बारसे हे व्यावसायाने ठेकेदार आहेत. जळगावातील विजया बँकेत काम असल्यामुळे ते शनिवारी दुपारी इन्होव्हा (क्रं.एमएच.19.सीपी.0091) ने जळगावात आले होते. त्यानंतर नवीपेठेतील प्रभात सोडा दुकानाजवळ त्यांनी इन्होव्हा उभी करून विजया बँकेत निघून गेले. इन्होव्हा कारचे दार लॉक नसल्याची संधी साधत चोरट्यांनी इन्होव्हामध्ये दहा हजार रुपये ठेवलेली बॅग चोरून नेली. यानंतर दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास उज्वलकुमार हे काम आटापून इन्होव्हा कारजवळ आल्यानंतर त्यांना कारमधील बॅग दिसून आली नाही. कारमध्ये तपासणी केल्यानंतर मिळून न आल्याने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
मुक्ताईनगरात सापडली एक बॅग ?
बॅग चोरीला गेल्याची घटना कळाल्यानंतर त्यांच्या कारजवळ उभी असलेली अमित सुंदरलाल सेवानी (वय-35 रा. अमरावती) यांची स्विफ्ट डिझायर कार (क्रं.एमएच.27.एआर.8017) मधून देखील अज्ञात चोरट्यांनी दारवाजा लॉक नसल्याचा संधी पाहत 5 हजार रुपये ठेवलेली बॅग व 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्याचे माहिती मिळाली. यानंतर घटनास्थळावरून दोन्ही कारमालकांनी लागलीच शहर पोलिस स्टेशन गाठत संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतद उज्वलकुमार बोरसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द एकूण 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी करत चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. दरम्यान, मुक्ताईनगर येथे एक बॅग सापडल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिस ठाण्याचे दृश्यंत खैरनार, प्रितम पाटील, नवजीत चौधरी, अमोल विसपुते अशांचे पथक मुक्ताईनगर येथे रवाना झाले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. तर त्यानुसार चोरट्यांचा शोध घेणे देखील सुरू आहे.