नवी मुंबईच्या माजी नगरसेवकाने आदित्य ठाकरेंची भेट घेतल्याने खळबळ

0

नवी मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व माजी परिवहन सभापती साबू डॅनियल यांनी वाशी येथे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची काही कामानिमित्त भेट घेतली असता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. दक्षिण भारतीय समाजातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून साबू डॅनियल यांची नवी मुंबईत ओळख असल्याने त्यांच्या ठाकरे भेटीने सोशल मिडीयावर गदारोळ माजला आहे.

बेलापूर विभागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व माजी परिवहन सभापती साबू डॅनियल हे पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात होती.त्यातच त्यांनी गुरुवारी वाशी येथे एका कार्यक्रमा निमित्त शिवसेना युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भेट घेतली असता त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिसेनेत प्रवेश केला या चर्चेला उधान आले.यावर त्यांना विचारले असता त्यांनी काही महत्वाच्या कामासाठी मी ठाकरे यांना भेटलो असल्याची कबुली दिली.शिवसेनेमध्ये जाण्याच्या सध्या विचार नसून भविष्यात काहीही होऊ शकते असे त्यांनी सांगितल्याने भविष्यात त्यांचा सेना प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.