नवी मुंबई । नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनजवळ एका मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये शरीरविक्रीचा काळाधंदा चालत होता. पोलिसांनी इथून तीन महिलांना अटक केली आहे. याशिवाय तीन मुलींचीही सुटका केली आहे. सुटका केलेल्या मुलींचं वय 16, 19 आणि 25 वर्ष आहे.
आईनेच ढकलले सेक्स रॅकेटमध्ये
16 वर्षांच्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. तर 19 वर्षीय मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला होता. याशिवाय 25 वर्षीय मुलगी विधवा आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहावीची परीक्षा दिलेल्या 16 वर्षांच्या मुलीला तिच्या आईनेच या सेक्स रॅकेटमध्ये ढकलले आहे. तर आपण एका बॉलिवूड दिग्दर्शकाची मुलगी असल्याचे 19 वर्षीय मुलीने सांगितले.
वाशीत घर भाड्याने घेवून व्यवसाय
पोलिसांनी या प्रकरणात शकीला शेख, पुष्पलता आणि मार्गेटला या तिघींनी अटक केली आहे. या तिघींनी वाशीमध्ये घर भाड्याने घेतले होते. तिथूनच ह्या शरीरविक्रीचा धंदा करत होत्या. या तिघी दलालांच्या माध्यमातून ग्राहकांना शोधत असत. पोलिसांना काही दिवसांपूर्वीच या सेक्स रॅकेटची कुणकुण लागली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले.