नवी मुंबई । नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सने जागतिक स्तरावरील कर्करोग सेवेसाठी नवी मुंबईत अत्याधुनिक आणि नव्या रेडिएशन तंत्रज्ञानाचे, ट्रूबिम एसटीएक्स स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी यंत्रणेचे नवी मुंबईत उद्घाटन केले. ट्रूबिम एसटीएक्सद्वारे प्रत्यक्ष इमेजच्या मार्गदर्शनाने केली जाणारी रेडिओसर्जरी अभूतपूर्व जलद गतीने आणि अचूक प्रकारे करता येते; यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात ट्यूमर असल्यास तेथपर्यंत पोचण्यास मदत होते. या सर्वोत्तम दर्जाच्या मशीनचे उद्घाटन डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष-अपोलो हॉस्पिटल्स ग्रूप यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र बडवे, संचालक- टाटा मेमोरियल सेंटर, कर्करोगाशी दोन हात केलेल्या रुग्ण आणि ख्यातनाम अभिनेत्री मनीषा कोईराला आणि प्रीथा रेड्डी, उपाध्यक्ष – अपोलो हॉस्पिटल्स ग्रूप आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्स ग्रूपचे अध्यक्ष डॉ. प्रताप रेड्डी म्हणाले की, आपल्या देशात कर्करोगामुळे पुष्कळ मृत्यू होतात.
यासाठीच रुग्णांना अत्याधुनिक सेवा आपल्याच देशात उपलब्ध व्हावी, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेबरोबरच अपोलो हॉस्पिटल्सने नेहमीचउपचारांच्या बदलत्या व नव्या पद्धती आणल्या आहेत. प्रीसिजन अँकोलॉजी ही त्यापैकीच एक आहे. अपोलोची कर्करोगाच्या निदानाची वेगळी पद्धती, उपचार पद्धती आणि कर्करोगावरील नियंत्रण पद्धती वैद्यकीय प्राप्तीला प्रोत्साहन ठरली आहे, ही पद्धती जगभरातील सर्वोत्तम पद्धतींपैकी एक आहे.