परमवीर सिंग यांची अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
मुख्यमंत्र्यांनी केल्या 11 आपर पोलीस महासंचालकांच्या बदल्या
हे देखील वाचा
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 11 अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्था महाराष्ट्र राज्य याठिकाणी करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांना नवी मुंबई पोलीस आयुक्त पदावर पाठविले आहे. तर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग या ठिकाणी नियुक्त केले असून पुण्याला आयुक्त म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त व्यंकटेश यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या पोलीस आयुक्त पदावर कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भुषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना अप्पर पोलीस महासंचालक सामुग्री व तरतुदी विभाग पोलीस महासंचालक कार्यालय येथे पाठविले आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ यांना राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचाक पदावर पाठविण्यात आले असून या ठिकाणी असलेले विवेक फ़णसाळकर यांना ठाणे पोलीस आयुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. संजीव सिंघल अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण अभिलेख केंद्र विभाग यांना अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, आर के पद्मनाभन अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य यांना नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. अमिताभ गुप्ता नियंत्रक वैध मापन शास्त्र विभाग यांना प्रधान सचिव गृह विभाग येथे पाठविण्यात आले आहे.
