नवी मुंबई। विशाल डोळस यांचे क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीपदी निवड होताच त्यांनी विविध योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत नगरसेवक विशाल डोळस यांनी अनेक नवीन विषयांना हात घातला आहे. यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक व शाळेच्या मैदानांची देखभाल व दुरुस्तीबाबत सर्वसमावेशक धोरण बनवणे, पालिकेच्या मालकीच्या मैदानावर क्रीडा संकुल व इनडोअर मल्टिपरपज खेळांचे हॉल बांधणे. वाशी येथील जलतरण तलावाच्या भूखंडावर तातडीने जलतरण तलाव बांधण्यात यावा त्यादृष्टीने तातडीने कारवाई करावी.
मनपाच्या बैठकीत नवा प्रस्ताव
भारतरत्न स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी येथे इनडोअर मल्टिपरपज खेळांचे हॉल व आउटडोअर सांघिक खेळाचे दर्जेदार मैदान तयार करणे. सिवूड्स- नेरुळ येथील सेक्टर 50 मध्ये खेळाचे मैदान असून परंतु या मैदानावर इनडोअर खेळाचे मैदान व टर्फ मैदान करून खेळाची सुविधा तयार करणे हे विषय बैठकीत घेण्यात आले. याबाबत तातडीने अंमल बजावणी करण्याचे आदेश सांस्कृतिक व क्रीडा विभागप्रमुख संदीप संगवे यांनी शहर अभियंता यांना दिले आहेत.