नवी मुंबई महानगरपालिकेतील ११ समित्यांच्या सभापतींची निवड

0

नेरुळ – नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सर्व ११ सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करत पिठासन अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी पुष्पगुच्छ देऊन निवड झालेल्या समिती सभापतींचे अभिनंदन केले.

परिवहन समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विसाजी लोके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रदिप गवस यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड झाली.  त्याचप्रमाणे ८ विशेष समित्या आणि २ तदर्थ समित्यांच्या सभापतीपदासाठी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने सभापतीपदी नगरसेवकांची निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी जाहीर केले.

  • आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती – उषा पुरुषोत्तम भोईर
  • महिला व बालकल्याण समिती – शिल्पा सुर्यकांत कांबळी
  • पाणी पुरवठा व मलनि:स्सारण समिती – अंजली अजय वाळुंज
  • समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती – अनिता सुरेश मानवतकर
  • विधी समिती – गणेश गंगाराम म्हात्रे
  • क्रीडा व सांस्कृतिक समिती – विशाल राजन डोळस
  • उद्यान व शहर सुशोभिकरण समिती – जयश्री एकनाथ ठाकुर
  • विद्यार्थी व युवक कल्याण समिती – प्रज्ञा प्रभाकर भोईर
  • नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती – नेत्रा आशिष शिर्के
  • पर्यावरण तदर्थ समिती – दिव्या वैभव गायकवाड
  • तसेच ८ विशेष समित्यांच्या उपसभापतीपदी खालील नगरसेविकांची निवड झाल्याचे संबंधित सभापतींनी जाहीर केले.
  • आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती – वैशाली तुकाराम नाईक
  • महिला व बालकल्याण समिती – छाया केशव म्हात्रे
  • पाणी पुरवठा व मलनि:स्सारण समिती – ॲड. भारती रविकांत पाटील
  • समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती – तनुजा श्रीधर मढवी
  • विधी समिती – सिमा चिंतामण गायकवाड
  • क्रीडा व सांस्कृतिक समिती – रमेश चंद्रकांत डोळे
  • उद्यान व शहर सुशोभिकरण समिती- सायली नारायण शिंदे
  • विद्यार्थी व युवक कल्याण समिती – संध्या रामजित यादव

नवनिर्वाचित सभापती व उप सभापतींचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी आपल्या दालनात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सभापती स्थायी समिती शुभांगी पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.