नवी मुंबई । गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कोण बनेगा महापौर, उपमहापौर या पदाचा आज फैसला असून दादांचाच महापौर होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गुरुवारी सकाळी होणार्या महासभेत नव्याने महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे तगडे दावेदार मानले जाणारे विरोधी पक्षनेते विजय चौगुले मैदानातच न उतरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही शर्यत सोपी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयवंत सुतार व शिवसेनेच्या वतीने सोमनाथ वास्कर यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरले, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला. मात्र, त्याच वेळी काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी त्यांच्या पत्नी वैजयंती भगत
काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
विजय चौगुले यांनी गणेशोत्सवापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिघा येथील गवते कुटुंबातील तीन नगरसेवकांना तर ते सोबत घेऊन फिरत होते. वाशीतील एका नगरसेविकेला परदेशात उपचारांसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील सात असंतुष्ट नगरसेवकांपैकी चार नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यात जमा होते. दोन अपक्ष नगरसेवकांना लक्ष्मीदर्शन झाल्याने तेही शिवसेनेला साथ देणार होते. भाजपच्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवक तर चौगुले समर्थक मानले जात होते. त्यामुळे शिवसेना-भाजपाचे 44, राष्ट्रवादीचे 4 व अपक्ष 2 अशा 50 नगरसेवकांची मोट बांधल्यानंतर काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती.
राष्ट्रवादीचा मार्ग खुला
महापौरपद मिळवण्यासाठी 56 चा आकडा गाठणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे 52 नगसेवक, 5 अपक्ष आणि 10 काँग्रेस नगरसेवकांच्या जोरावर हा आकडा गाठण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. काँग्रेसच्या 10 नगरसेवकांतील दुफळी मुळे नवी मुंबई महापालिकेचे महापौरपद राखण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग खुला झाला आहे. या पदासाठी गेले तीन महिने शक्य ते सर्व डावपेच खेळणारे शिवसेनेचे विजय चौगुले यांची गणिते चुकल्यामुळे त्यांनी शुक्रवारी या पदासाठी अर्ज भरला.
युतीतील कटुता पथ्यावर
अडीच वर्षांपूर्वी पाच अपक्ष व दहा काँग्रेस नगरसेवकांच्या जोरावर नवी मुंबई पालिकेतील सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून यंदा महापौरपद जाते की काय, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सेना-भाजपमधील राज्याच्या स्तरावरील कटुता राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आणि त्यांचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. गेली अडीच वर्षे महापौरपदी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होता. मात्र, पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे.