नवी मुंबई व पुणे महापालिकेस उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्कार

0
मुंबई : नवी मुंबई व पुणे महापालिकेसह 6 खाजगी संस्थांना ‘हडको’ चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार आज नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले. हडको चा 48 व्या वर्धापन दिनानिमित्त्‍ आयोजित संमारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदिपसिंह पूरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास हडको चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एम. रविकांत, गृहनिर्माण विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा,  हडको चे मुख्य वित्तीय अधिकारी राकेश कुमार अरोरा आदि उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेच्या दोन उपक्रमांना पुरस्कार
नवी मुंबई महापालिकेच्या ई-तक्रार निवारण प्रणाली व दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण करणारे शिक्षण-प्रशिक्षण-सुविधा केंद्र या उपक्रमासाठी उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार प्रदान करण्यात आले. 4 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महापौर जयवंत सुतार  ई.टी. सी . केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुणे महापालिकेस दोन पुरस्कार
 पुणे महानगरपालिकेने  सार्वजनिक खाजगी सहभागी तत्वावर (पी.पी.पी) राबविलेला र्स्माट सिटी लाईटिंग या प्रकल्पास  उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार मिळाला आहे. पुणे शहरात 84 हजार एलईडी बल्ब बसविण्यात आले असून यामुळे महापालिकेची दरमहा  दीड कोटी रुपयांची बचत होत आहे. नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून या प्रकल्पाची नोंद घेऊन महापालिकेस हडको चा उत्कृष्ठ कार्यप्रणाली पुरस्कार देण्यात आला. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतुक पाहता या रस्त्याचे रुपांतरण करुन र्स्माट सिटी डिझाईन या संकल्पनेवर आधारीत  नियोजनबध्द आराखडा तयार केल्याबद्दलही महापालिकेस पुरस्कृत करण्यात आले. 4 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती शितल उगळे व मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.