मातोश्री महिला मंच व ब्रम्हकुमारी केंद्राचा पुढाकार
नवी सांगवी : विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा व महिलांनी महिलांच्या मदतीने आपल्या कर्तुत्वाला उभारी देऊन प्रगती साधावी यासाठी मातोश्री महिला मंच व प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या सहकार्याने महिलांसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणार्या संस्थेच्या शंभरहुन अधिक महिलांनी विविध वेशभूषा परिधान करून रॅलीचे आयोजन केले होते. अतिशय शिस्तबद्ध रीतीने व विविध प्रकारच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी विविध कर्तृत्वाने आपले नाव उंचवणार्या महिलांच्या वेशभूषा व त्याप्रमाणे देखावे निर्माण करून रॅलीत सहभाग घेतला.
आधुनिकते बरोबरच परंपरेची कास धरून, संस्काराची शिदोरी घेऊन, ती प्रत्येक कुटुंबात आणि त्याबरोबरचण्यासाठी. लेक वाचवा लेक शिकवा, नेत्रदान, रक्तदान, अवयव दान, श्रेष्ठदान, प्लास्टिकची घडण, संपूर्ण समाजात रुजव गाईगुरांचे मरण, विज्ञानावर ठेवू श्रद्धा दूर करू अंधश्रद्धा, पाणी हे जीवन आहे, पाणी वाचवा जीवन वाचवा व त्याचा वापर जपून करा अशा विविध घोषणा यावेळी महिलांनी दिल्या. ह्या रॅलीमध्ये 100 पेक्षा जास्त महिलांनी भाग घेतला. रॅली क्रांती चौक, फेमस चौक, साई चौक मार्गे क्रांती चौक येथे समारोप करण्यात आला रॅलीत रमाबाई आंबेडकर, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, जिजाबाई, सिंधुताई सपकाळ, राणीलक्ष्मीबाई तर डॉक्टर, वकील, नर्स, न्यायाधीश, अंतराळवीर, पोलिस ऑफिसर आदी वेशभूषा व देखाव्यात महिलांनी परिसरातील जाणार्या येणार्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
विविध महिलांचा सत्कार
यावेळी उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. राजश्री पोटे या तळागाळातील महिलांसाठी विविध समस्या, सेवा, योजना, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी काम करीत असतात त्यांच्या या कामासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या वर्गातील शिवानी लोंढाळकर है मुलीने महिला बालकल्याण चित्रकला स्पर्धेत महिला बचाव या विषयावर चित्र काढले. धनकवडी ग्रामपंचायतच्या महिला पोलिस पाटील विद्या ताकवले यांचाही सत्कार करण्यात आला. मातोश्री महिला मंच मोफत मार्गदर्शन व मदत केंद्र सुरू ठेवून महिलांना सक्षम बनवण्यासाठी कार्य करणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. सूत्रसंचालन व प्रास्तविक सुरेखा साळुंखे यांनी तर आभार प्रियंका साळुंखे यांनी मानले.