नव्या क्षेत्रिय कार्यालयांसाठी अधिकार्‍यांची नियुक्ती

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या नव्याने करण्यात आलेल्या ’ग’ क्षेत्रिय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी दिलीप आढारी यांच्याकडे तर ’ह’ क्षेत्रिय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी आशा राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. दोन्ही क्षेत्रिय कार्यालयांसाठी अधिकार नियुक्ती करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची याआधी सहा क्षेत्रिय कार्यालये होती. त्यामध्ये पुनर्रचना करून सत्ताधार्‍यांनी दोन क्षेत्रिय कार्यालयांची निर्मिती केली आहे. ’अ’, ’ब’, ’क’, ’ड’, ’इ’, ’फ’, ’ग’ आणि ’ह’ ही आठही क्षेत्रिय कार्यालय नऊ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

कार्यालय अधीक्षकही नियुक्त
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ’ग’ आणि ’ह’ क्षेत्रिय कार्यालयांसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. एलबीटी विभागाचे प्रशासन अधिकारी दिलीप आढारी यांच्याकडे ’ग’ क्षेत्रिय अधिकारीपदाचा, तर प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिकारी आशा राऊत यांच्याकडे ’ह’ क्षेत्रिय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. करसंकलन विभागाचे मुख्य लिपिक श्रीकांत कोळप यांच्याकडे ’ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यालय अधीक्षकपदाची, तर ’ब’ क्षेत्रिय कार्यालयाचे मुख्य लिपिक पोमण यांच्याकडे ’ह’ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यालय अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.