नवी दिल्ली । आता पासपोर्ट बनवणे आणखीन सोपे आणि सहज होणार आहे. कारण 50 किलोमीटर अंतरापर्यंत पासपोर्ट केंद्र सुरु करण्याच्या योजनेला सुरूवात करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 149 पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांची घोषणा केली आहे. याआधी देशात एकूण 77 पासपोर्ट कार्यालय आहेत. त्यातच आता नव्या 149 पासपोर्ट कार्यालयाची घोषणा करण्यात आली आहे.यातील परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात 86 पीओपीएसके सुरु करण्यात येणार आहेत.