चिंचवड : नव्या कोर्या स्विफ्ट कारची पीएमपीएमएल बसला धडक बसली. हा अपघात शुक्रवारी दुपारी चिंचवड येथे झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएल बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 2137) चिंचवड मधून जात होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने बसला मागून जोरात धडक दिली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडक दिलेल्या मोटारीला नंबर प्लेट लावलेली नाही. शोरूममधून वाहन घेतानाच नंबर प्लेट लावून वाहन रस्त्यावर येणार असल्याची घोषणा मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली. मात्र, परिवहन खात्याचे नियम शोरूमकडून धाब्यावर बसवले जात असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.