नव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच समिती स्थापन

0

इसिएतर्फे पर्यावरण साहित्याचे वाटप

पिंपरी : 2004पासून पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात 376 शाळांमध्ये विद्यार्थी पर्यावरण समिती स्थापन केली आहे.
या प्रत्येक समितीला पर्यावरण साहित्य इसिएतर्फे मोफत वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक समितीला नोंद वह्या, बिल्ले, टोप्या, अभ्यास पुस्तिका, पर्यावरण कार्टून फिल्म सीडी, 10 इंची कुंड्या, ओळख पत्र आदी साहित्य देण्यात आले. वाटप केलेल्या साहित्याचा योग्य वापर केला जातोय की नाही याकडे लक्ष दिले जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील पहिली विद्यार्थी पर्यावरण समिती जिल्हा परिषद शाळा सांगवडे येथे स्थापन केली. ह्या शाळेत 113 नव्याने पर्यावरणा दूत निर्माण केले. आजपर्यंत इसिएच्या अविरत प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहरात 12000 च्या पेक्षा जास्त पर्यावरण दूत तयार केले आहेत.

संवर्धनाबाबत केले मार्गदर्शन
शाळा सुरु झाल्या बरोबर विद्यार्थी पर्यावरण समिती केली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक साहित्य वाटप करताना थेट विद्यार्थ्यांसोबत घन कचरा व्यवस्थापन, पाणी बचत, प्लास्टिकमुक्त गाव, वृक्षारोपण व रुक्ष संवर्धनाबाबत चर्चा करून पर्यावरण संवर्धनाचे महत्व इसिए संचालक विकास पाटील यांनी सोप्या शब्दात समजावून सांगितले. शाळा मुख्याध्यापिकांकडे समारंभपूर्वक सर्व साहित्य सुपूर्द करण्यात आले. साहित्य वापराबाबत सर्व सुचना पर्यावरण दूत प्रदीप सपकाळ सरांना देण्यात आल्या. या शाळेत पिशवीत रोपे बनविणे, गावात कुटुंब भेटी करून पर्यावरण संवर्धन बाबत जनजागरण व प्रबोधन करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करणेआयोजन करण्यासाठी नजदीकच्या काळात ग्रामस्थांसोबत बैठक होणार आहे. त्यासाठी इसिएचे पदाधिकारी पुढाकार घेणार आहेत. शाळा मुख्याध्यापक श्रीधर उतेकर , इसिए चेअरमन विकास पाटील, पुरूषोत्तम पिंपळे, शाळा शिक्षक संदीप सपकाळ, स्वाती जगताप, अण्णासाहेब ओहोळ, उर्मिला शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मेरुकर यांनी केले व आभार दत्तात्रेय कुमठेकर यांनी मानले.