नशिराबादच्या इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

जळगाव : तालुक्यातील भादली गावाजवळ 40 वर्षीय तरूणाचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अफसर अली रमजान अली (40, नशिराबाद, ता.जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव तालुक्यातील भादलीजवळ डाउन रेल्वे लाईनवर खांबा क्रमांक 429/19 एमएल याठिकाणी रेल्वेच्या धडकेत अफसर अली रमजान अली यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, 20 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तरुणाची ओळख पटविली असता मयत नशीराबाद येथील अफसर अली रमजान असे असल्याचे समोर आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास एएसआय संजय जाधव करीत आहेत.