नशिराबाद : नशिराबाद येथे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने उडवल्याने गावातील 55 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जगन्नाथ रघुनाथ मिस्तरी (55, रा.खालची अळी, नशिराबाद) असे मयताचे नाव आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जगन्नाथ रघुनाथ मिस्तरी (55, खालची अळी, नशिराबाद) हे मंगळवार, 12 एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील बसस्थानकाजवळून राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन पसार झाला. याबाबत सुधाकर रामदास जाधव यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.