भुसावळ- जळगाव-नशिराबाद दरम्यान असलेल्या फटाक्यांच्या गोदामाची जळगाव आयकर विभागाच्या चार अधिकार्यांनी बुधवारी तपासणी केल्याने खळबळ उडाली आहे. जळगावातील बिल्डर तसेच फटाका व्यावसायीक युसूफ मकरा यांचे नेरी तसेच नशिराबादजवळ फटाक्यांचे होलसेल गोदाम असून जिल्ह्यातून दररोज हजारो ग्राहक येथे येत असल्याने लाखोंची दररोज उलाढाल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव आयकर विभागातील चार अधिकारी पांढर्या रंगाच्या टवेरा (एम.एच.19 वाय.5515) द्वारे बुधवारी चार वाजेच्या सुमारास गोदामात धडकले. सुरुवातीला संगणकावर होत असलेल्या फटाक्यांच्या नोंदीबाबत अधिकार्यांनी माहिती जाणून घेतली तसेच ग्राहकांना देण्यात येत असलेल्या बिलांचे मोबाईलमध्ये फोटोही घेतले. दरम्यान, युसूफ मकरा यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.