भुसावळ : सावदा येथून दुचाकीने जळगावकडे निघालेल्या दोघांचा नशिराबादजवळ अपघाती मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास भाऊच्या ढाब्याजवळ ही घटना घडली. राजेंद्र भादू डोळे (42, पाटीलपूरा, रा.सावदा) व शेख मेहमूद शेख रज्जाक (55, रा.सावदा) अशी मयतांची नावे आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दोघे जण दुचाकी (एम.एच.19 सी.पी.2044) जळगावकडे निघाले असताना दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अत्यवस्थ अवस्थेतील जखमींना रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे व सहकारी करीत आहेत.