नशिराबादजवळ भरधाव ट्रकने एकाला चिरडले

0
भुसावळ : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गोदावरी रुग्णालयाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला आधी गोदावरी व नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याचे नाव व गाव कळू शकले नाही मात्र घटनास्थळी दुचाकी (एम.एच.19 बीसी 4598) आढळली असून त्यावर कोळी राजा असे लिहिले आहे.