नशिराबादला अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- नशिराबाद गावातील 11 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना 13 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अत्याचार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तुकाराम विश्‍वनाथ रंगमले (60, भवानीनगरज, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. पीडीत बालिका 13 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भवानी नगर भागातील वीटभट्टी परीसरात शौचास जात असताना आरोपीने अत्याचार केला. पीडीत बालिका भेदरलेल्या अवस्थेत घरी आल्यानंतर तिने वडीलांना घटना सांगितल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्यामकुमार मोरे करीत आहेत.