नशिराबादला जीना बसविण्याच्या कारणावरुन शिक्षकाला मारहाण

जळगाव । नशिराबाद येथे जीन बसविण्याच्या कारणावरुन वाद झाला. यात एका शिक्षकाला सहा जणांनी  मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. 

वसिम अक्रम शेख मुसा कुरेशी (वय 32, रा. कुरेशी मोहल्ला, नशिराबाद) हे शिक्षक आहेत. मुनीफ खाटीक याने जीना बसविण्याच्या कारणावरुन अक्रम शेख यांच्याशी बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गल्लीत वाद घातला. यात मुनीफ खाटीक याच्यासह शरीफ खाटीक, वहिदा मुस्ताक खाटीक, एजाज मुस्ताक खाटीक, नूरजहा शरीफ खाटीक, वहिदा मुनाफ खाटीक यांनी वसीम कुरेशी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. या हाणामारीत कुरेशी यांच्या हाताला चावा घेतला आहे. तसेच दगड व विटा फेकून मारल्या. तर शिक्षकाला ठार मारण्याची धमकी दिली. जखमी कुरेशी यांच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींंच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.