नशिराबादला महिलेला मारहाण : तरुणाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : तालुक्यातील नशीराबाद येथे अंगणात दुचाकी उभी करण्यास नकार दिल्याने महिलेला तरुणाने अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना मंगळवार, 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात रुपेश संजय माळी (रा.महाजनवाडा, नशिराबाद) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात गुन्हा दाखल
नशिराबाद येेथील रहिवासी 52 वर्षीय महिला मंगळवारी घरी होती. यादरम्यान तिने तिच्या अंगणात दुचाकी उभी करण्यास रुपेश संजय माळी या तरुणास नकार दिला. त्यावरुन रुपेश याने महिलेला अश्लिल शिवीगाळ करत, चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. महिलेने पोलिसात तक्रार देईन असे सांगितले असता रुपेश याने महिलेला तुला मारुन टाकीन, तुझ्या मागे रडणारे कोणीच नाही, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या महिलेच्या तक्रारीवरुन रुपेश संजय माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहेत.