नशिराबाद टोल नाका अखेर बंद

0

मुदत संपली ; वाहनधारकांना दिलासा

भुसावळ – भुसावळ-जळगाव महामार्गावरील नशिराबाद टोल नाका मुदत संपल्याने शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेपासून बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशोक बिल्डकॉनकडून या टोल नाक्यावरून गेल्या काही वर्षांपासून टोलची वसुली करण्यात येत होती. 23 रोजी या टोल नाक्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास टोल नाक्यावरून कर्मचारी हटवण्यात आले तसेच टोल वसुली बंदबाबतचा फलकही लावण्यात आला. टोल नाका बंद झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनधारकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.