नशिराबाद येथे महिलेस बोलल्यावरुन तुंबळ हाणामारी

Abuse of woman accompanying husband : Riot after asking reason : Crime against 36 persons जळगाव : तालुक्यातील नशिाबाद येथे पतीसोबत दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेला उद्देशून एकाने अपशब्द काढले व ही बाब महिलेच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्याने जाब विचारल्याने महिलेच्या पतीसह त्यांच्या कुटुंबाला हल्ला करीत मारहाण करण्यात आली. या घटनेत लाठ्या-काठ्या, दगड विटा, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. हाणामारीत आठ जण जखमी झाले. या प्रकरणी सोमवार, 8 ऑगस्ट रोजी नशिराबाद पोलिसात 36 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद
नशिराबाद शहरातील रहिवासी साजिद फरीद शाह (24) हे 2 ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी शैनीला बी.शाह यांना दुचाकीवरुन दवाखान्यात जात होते. यावेळी गावातील शिवाजी चौकामध्ये शरीफ पिंजारी याने साजीद शाह व त्यांची पत्नी शैनीला यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केलं. कुणाला बोलला असे विचारताच असता शरीफ पिंजारी याने साजीद शाह याच्या कानशिलात लगावली. यानंतर साजीद शाह वडील आणि भावाला सोबत घेवून पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असतांना यावेळी पुन्हा शरीफ पिंजारी याने साजीद शाह यांच्या वडील व भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी साजीद शाह याचे कुटुंबिय नातेवाईक हे आले असता शरीफ पिंजारी याच्यासह त्यांच्यासोबत 30 ते 35 जणांनी साजीद शाह यांच्यासह त्यांच्या कुटुंबिय नातेवाईकांना काठ्या, लोखंडी रॉड, दगड विटांनी मारहाण केली. या घटनेत साजीद फरीद शाह, जावीद फरीद शाह, फरीद चाँद शाह, आरिफ शरिफ शाह, सलीम नुरा शाह, मुस्कान बी मुस्ताक शाह, रीजवाना बी.फजल शाह, सलीम नुरा शाह हे आठ जखमी झाले आहेत.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी साजीद शाह यांच्या तक्रारीवरुन शरीफ रज्जाक पिंजारी, आरिफ शरीफ पिंजारी, मोहसीन शरीफ पिंजारी, कलीम शरीफ पिंजारी, शोएब शरीफ पिंजारी, शकील रज्जाक पिंजारी, शाकीर शकील पिंजारी, जहिर बिस्मील्ला पिंजार, आसिफ पिंजारी, बशीर पिंजारी, बबलु पिंजारी, जावीद बशीर पिंजारी, आबीद बशीर पिंजारी, आसिफ रशीद पिंजारी, अय्युब निजाम पिंजारी, रईस मुसा पिंजारी, मुसा निजाम पिंजारी, रईस रमजान पिंजारी, आसिफ रमजान पिंजारी, मोहसीन रमजान पिंजारी, इम्रान रमजान पिंजारी, फारुक पिंजारी, गोलू पिंजारी, साबीर पिंजारी, आसीफ पिंजारी, रऊफ पिंजारी, नवाज पिंजारी, मुस्ताक पिंजारी, जावीद पिंजारी, आरीफ रशीद पिंजारी, इक्बाल हारुन पिंजारी, रहेमान रज्जाक पिंजारी, इरफान रहेमान पिंजारी, शरीफ रज्जाक पिंजारी (सर्व रा.मोमीन मोहल्ला, नशिराबाद) या 36 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.