नशिराबाद येथे लोखंडी अँगल व प्लेटांची चोरी

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रूपये किंमतीचे लोंखडी अँगल व प्लेटा चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील मोकळ्या जागेवर लोखंडी अँगल आणि लोखंडी प्लेट व इतर बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. हा सामान 7 मार्च ते 17 दरम्यात तिथेच पडून होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेटा आणि लोंखडी अँगल चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी शुभम किशोरराव चिमोटे (26, रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ, भुसावळ) यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गजानन देशमुख करीत आहे.