नशिराबाद येथे शिवसेनेचा राष्ट्रवादीला पुन्हा ‘दे धक्का’
माजी सरपंचांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रवादीचे माजी सरपंच विकास पाटील यांनी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश केला. ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी विकास पाटील हे समर्थकांसह शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने याचा निवडणुकीतील समीकरणावर निश्चित परिणाम होणार आहे. पालकमंत्र्यांनी विकास पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे स्वागत करून नशिराबादच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेने राष्ट्रवादीला खिंडार पाडत ‘दे धक्का’ दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, आज अजिंठा विश्रामगृहात नशिराबाद येथील माजी सरपंच विकास पाटील यांच्यासह इतरांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यात प्रामुख्याने माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाजन, शेख सत्तार, शेख मजीद, युसुफखान जमशेर खान, संदीप पाटील, सुपडू चौधरी, पराग देवरे, अहमद शेख सत्तार, मोईन खान युसुफखान, भुषण माळी, सय्यद सलीम रज्जाक अब्बास, सागर पाटील, जगदीश माळी, रितेश महाजन, संजू माळी, दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला.