नशिराबाद : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा स्पार्किंगमुळे शेतातील ऊसाला आग लागल्याने दोन शेतकर्यांच्या शेतातील सुमारे 10 लाख रुपयांचा ऊस जळून खाक झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शेतातील वीज जारांमुळे लागली आग
शहरातील वाहिद रज्जाक पिंजारी (43, रा.म्हसावद) हे शेती करून उदनिर्वाह करतात. त्यांचे नशिराबाद शिवारात शेत असून गुरुवार, 30 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काम करीत होते. याचवेळी त्यांच्या शेतालगत असलेल्या भुषण भागवत राणे यांच्या शेतातून विजेचे तार गेल्याने वादळामुळे वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि त्यामुळे राणे यांच्या शेतातील ऊसाला आग लागली. बघताच आगीने रौद्ररुप धारण करीत शेजातील वहिद पिंजारी यांच्या शेतातदेखील पसरू लागली. या आगीमुळे दोघा शेतकर्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतकर्यांनी आगीची माहिती नशिराबाद पोलिसात दिल्यानंतर शुक्रवारी नशिराबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुधीर विसपुते करीत आहेत.