विरार । वाडा तालुक्यातील पोसट, कंचाड येथील सुरेश हरी मोर 40 हा भाविक या आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला मोटार बाइकवर बसवून मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबई दिशेकडे जात होता. तो महामार्गावरील कोपर फाट्याच्या अगोदर लागणार्या नाल्याजवळ आला असताना बाइक स्लिप झाली व 50 फूट फरफटत रस्त्याच्या खाली गेली. रात्री 10 च्या सुमारास झालेल्या या अपघातात चालक सुरेश व भाविक यांना दोघांनाही जबर मार लागला आहे. त्यांना नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असून मांडवी पोलिसांत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. बाइक चालक हा नशा करून बाइक चालवत असल्याचे पुढे आले आहे.